एच2ओ मरीनटेक कंपनी गेली १५ वर्ष जलतरण ह्या क्रिडा प्रकारात कार्यरत आहे. जलतरण प्रशिक्षणाची प्रथम सुरुवात महात्मा गांधी ऑलिंपिक जलतरण तलाव येथे २००० साली झाली. त्यावेळी शालेय तसेच कॉलेज विद्यार्थी यांच्या उत्तम प्रतिसादामुळे कंपनीने ठरवले की, जर, फक्त दादर विभागातील शालेय व कॉलेज विद्यार्थीपुरते मर्यादित न राहता ह्या क्रिडा प्रकाराचा प्रसार करायाचा असेल तर विविध विभागात जलतरणाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले पाहिजे. ह्या हेतूने प्रेरित होऊन खालील ठिकाणी पोहण्याचे प्रशिक्षण सुरु केले.
सदर जलतरण काही तासांकरीता तलाव भाडे तत्वावर घेऊन तेथे प्रशिक्षण सुरु आहे.
एच 2 ओ कंपनी ही पोहोण्याच्या तलावाचे व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, तांत्रिक मार्गदर्शन, जलतरण जीवरक्षक सेवा, पोहण्याचे झटपट आणि तरीही उत्कृष्ठ प्रशिक्षण, पोहणे कसे शिकवायचे ह्याचे प्रशिक्षण अश्या विविध सेवा अनेक वर्षांपासून देत आहे. ह्या सर्व सेवांविषयी अधिक महितीसाठी कृपया राजेश राणे – 9987412111 ह्यांना संपर्क करा.
पोहोण्यासाठी लागणार्या विविध वस्तूंसाठी कृपया इथे क्लिक करा.




