एच 2 ओ मरीन टेक कंपनीने सामाजिक बांधिलकीने केलेली कामे पुढिलप्रमाणे आहेत.
१)सन २००१ पासून एच 2 ओ मरीन टेक कंपनीचे निष्णात पुरुष / महिला जीवरक्षक, गणपती विसर्जन कालावधीत, गणेश भक्तांच्या रक्षणाकरता खोल पाण्यात, जिवाची पर्वा न करता, कोणताही मोबदला न घेता, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या सहकार्याने, वाहतूक नियंत्रण शाखा (शिक्षण विभाग) यांस सहकार्य करीत आहेत. सदर जीवरक्षक दादर-गिरगाव चौपाटीवर कार्यरत असतात.



२)भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीत लाखोंच्या संख्येने भीमसागर दादर चौपाटीवर येत असतात. अश्या दादर चौपाटीवर कोणतीही जीवीतहानी होऊ नये तसेच पालिका प्रशासनास सहकार्याच्या भावनेने एच 2 ओ मरीन टेक कंपनीचे १५ जणांचे पथक कार्यरत असते.


३)एच 2 ओ मरीन टेक कंपनीने Scuba Diving (स्कुबा डायविंग) हा साहसी क्रिडा प्रकार २०१५ पासून सुरु केला. सदर क्रिडा प्रकाराची प्रात्यक्षिक खालील दर्शवलेल्या जलतरण तलावात सुरु करण्यात आली आहेत. सदर क्रिडा प्रकाराची साधन सामुग्री फारच महाग आहे. परंतू तरीही सदर क्रिडा प्रकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा ह्या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला.
१) दादर क्लब – दादर (पूर्व)

२) चेंबूर जिमखाना – चेंबूर (पूर्व)

३) मुथालिया रेसीडन्सी – काळाचौकी

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.